सोन्याला कधी सुगंध नसतो...
विस्तार:- @sinetarkamarathifilmproduction जी व्यक्ती हे संसार बंधनातून मुक्त हो ऊ इच्छिते, त्या व्यक्तीने आपल्या विषय आणि वासना ह्यांच्यावर ताबा मिळवायला हवा. जे वाईट त्याचा प्रयत्नपूर्वक त्याग करायला हवा. दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांच्या बोलण्यात कटुता असते, कारण आधी ती त्यांच्या मनात असते. काही गोष्टींचा आपण बारकाईने विचार करायला हवा. जसे की सोन्याला कधी सुगंध नसतो. ऊसाला कधी फळ येत नाही, चंदनाच्या झाडाला फुले नसतात. जी व्यक्ती ज्ञानी, बुद्धिवान असेल, ती धनवान असेलच असे नाही. अमृताचा लाभ माणसाच्या दृष्टीने फार मोलाचा असतो. हे अमृत त्याला पाणी ,अन्न, औषध ह्या रुपाने ही मिळत असते.आपल्या ज्ञानी गणितकार, खगोलशास्त्रचे अभ्यासक यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढताना आचार्य म्हणतात कि, ही विद्वान मंडळी आकाशात गेली नाहीत.पण यांनी इथे खाली पृथ्वीवर बसून ग्रह, नक्षत्र,तारे, चंद्र, सूर्य यांच्या भ्रमणासंदर्भात मांडलेले अनुमाने, ग्रहांची दिलेली पूर्व माहिती या गोष्टी त्यांची बुद्धिमत्ता आणि कौशल्य ही सिद्ध करण्यास पुरेशा आहेत. आचार्य हे व्यक्तीने त्याच्या जीवनात कुठे, कशी आणि किती...