सोन्याला कधी सुगंध नसतो...


 विस्तार:-

@sinetarkamarathifilmproduction

जी व्यक्ती हे संसार बंधनातून मुक्त हो ऊ इच्छिते, त्या व्यक्तीने आपल्या विषय आणि वासना ह्यांच्यावर ताबा मिळवायला हवा. 

जे वाईट त्याचा प्रयत्नपूर्वक त्याग करायला हवा. दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांच्या बोलण्यात कटुता असते, कारण आधी ती त्यांच्या मनात असते. 

काही गोष्टींचा आपण बारकाईने विचार करायला हवा. जसे की सोन्याला कधी सुगंध नसतो. ऊसाला कधी फळ येत नाही, चंदनाच्या झाडाला फुले नसतात. जी व्यक्ती ज्ञानी, बुद्धिवान असेल, ती धनवान असेलच असे नाही. 

अमृताचा लाभ माणसाच्या दृष्टीने फार मोलाचा असतो. हे अमृत त्याला पाणी ,अन्न, औषध ह्या रुपाने ही मिळत असते.आपल्या ज्ञानी गणितकार, खगोलशास्त्रचे अभ्यासक यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढताना आचार्य म्हणतात कि, ही विद्वान मंडळी आकाशात गेली नाहीत.पण यांनी इथे खाली पृथ्वीवर बसून ग्रह, नक्षत्र,तारे, चंद्र, सूर्य यांच्या भ्रमणासंदर्भात मांडलेले अनुमाने, ग्रहांची दिलेली पूर्व माहिती या गोष्टी त्यांची बुद्धिमत्ता आणि कौशल्य ही सिद्ध करण्यास पुरेशा आहेत.

आचार्य हे व्यक्तीने त्याच्या जीवनात कुठे, कशी आणि किती सतर्क राहिला हवे याबाबत मार्गदर्शन केले आहे. कुठे, कशी आणि कोणती सुरक्षितता राखायला हवी तेही ते सांगतात. 

तसेच आचार्य हे प्रत्येकाला त्याच्या स्वभावातील गुणदोष हे साक्षीत्वाने पहायला सुचवतात. ब्राह्मणाने पतितांकडून मदत  घेऊ नये . विनाकारण इतरांना पीडा करू नये.साप ,जंगली डुक्कर, आणि कुत्रा ह्यांना झोपले असताना जागे करण्याची चुक करू नये.ती जीवावर बेतू शकते.माणसाने कोणती गोष्ट केव्हा करावी ह्याबद्दलही आचार्य असे सांगतात की, खरंतर जी ती गोष्ट ही ज्या त्या वेळीच करणे हे योग्य आहे.इथे ते मूर्खाचे वर्तन हे कसे अयोग्य असते ते सांगतात.

माणसाने जीवनातल्या कठीण प्रसंगी धैर्य दाखवायला हवे .त्यांनी सर्व व्यवहारात सावधानता बाळगावी.कष्टाच्या बाबतीत मात्र मागे राहू नये.धैर्य ,कष्ट , सावधानता ह्याने आपल्याला दुःखावर , संकटावर, वाईट परिस्थितीवर मात करता येते..

धन्यवाद........

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरं सत्य पाहा.....

खरे श्रीमंत कोण, ते पाहा ?

जीवनातील महत्त्वाच्या तीन गोष्टी:-