कोणाला समाजात मानाचे स्थान मिळते.



 भावार्थ मार्गदर्शिका :- 

      जी व्यक्ती वेदशास्त्र ह्यांचा  अभ्यास करते.त्याचे वाचन ,मनन, चिंतन करते त्यास ज्ञानप्राप्ती होते.जी व्यक्ती ज्ञानी आहे , बुद्धीमान आहे ,अशा व्यक्तीस समाजात मानाचे स्थान मिळते. मनुष्याला प्राप्त होणारा हा नरजन्म  बहुभाग्याने लाभते असतो, म्हणुन त्याने त्याचा अधिकाधिक चांगल्या पुण्यदायी कार्यासाठी वापर करायला हवा .अभ्यासाने त्यास शुभ -अशुभ , योग्य -अयोग्य कार्य कोणते ह्याचे अचूक ज्ञान होते.

     ज्याच्याजवळ धन आहे अशाच व्यक्तीच्या सहवासात त्याचे अतिष्ठ राहत असतात अशा माणसाशीच लोक मैत्री सख्य करतात.त्यास मान देतात. माणसाच्या जीवनातील वेळ ही एक अमूल्य अशी गोष्ट आहे तिचा सदुपयोग करायला हवा माणसाला त्याचा सोर्स स्वार्थ हा लोभी आणि आंधळा बनवितो जीजी गर्मी करत असतो त्या कर्माच्या बंधनात तो नकळत बांधला जात असतो कर्म हे जसे कोणाला चुकत नाही चुकवता येत नाही त्याचप्रमाणे त्या कर्माच्या भल्या वाईट फलप्राप्तीपासून जीवाची सुटका नसते त्या स्त्री कर्मफल हे भोगावेच लागते .

  संसारात स्त्रीच्या कर्माची फळे तिच्या पतीस ,तर पतीच्या कर्माची फळे पत्नीस भोगावी लागतात. माता पित्याच्या कर्जाची परतफेड ही मुलांना करावी लागते यानंतर काही मानवी जीवनातील समस्यावरील भाषेत केले आहे विद्वान व्यक्तीला गोड बोलून दृष्ट व्यक्तीशी प्रसंगांनुरूप वागून आपले हित साधता येते ज्या राज्यात राजा नाही शासन नाही सुरक्षितता नाही तिथे शहाण्या माणसाने राहू नये वाईट दृष्ट कपटी मित्रांच्या सोबत राहण्यापेक्षा एकही मित्र नाही असे एकाकी अवस्थेत राहणेच हिताचे असते.

  सिंहाकडुन आपले कार्य साधण्यासाठी पूर्ण शक्ती वापरावी हे शिकावे मासे पकडणाऱ्या बगळ्याकडून एकाग्रता शिकावी, कोंबड्या कडून पहाटे लवकर उठण्याचा गुण घ्यावा कावळ्याकडून चतुर्था हुशारी शिकावी, कुत्र्याकडून आपल्या मालकावर कसे आणि किती प्रेम करावे, हे मान कसे राखावी, सतर्क कसे राहावे हे सारख्या गोष्टी शिकाव्यात.

माणसाने अवतीभवती डोळस नजरेने पाहिले तर त्याला असे अनेक जीव दिसतील की,जे त्यास जीवन कसे जगावे हे शिकवत ,सांगत आणि दाखवत असतात.

   धन्यवाद......


  


          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरं सत्य पाहा.....

खरे श्रीमंत कोण, ते पाहा ?

जीवनातील महत्त्वाच्या तीन गोष्टी:-