कधिच गरीब होणार नाही ही व्यक्ती:-

उद्योगे नाचती दारिद्र्य जपतो नास्ति पातकम् ।
मौने च कलहो नास्ति नास्ति जागरिते भयम्. ।।

भावार्थ मार्गदर्शिका,:-
   जी व्यक्ती उद्योगधंदा करणारी आहे. काम करणारी आहे . त्यांच्याकडे दारिद्रयता ,निर्धन याही राहातं नाही.कारण जिथे हात राबतात ,त्या राबणा-या हातांना लक्ष्मीचे वरदान मिळते .त्या व्यक्तीस पैसाअडका, धनसंपत्ती प्राप्त होते.जी व्यक्ती सतत ईश्वराच्या नामाचे स्मरण करणे , अशा व्यक्तीचे पाप नाहीसे होते.त्याच्या पदरी पुण्याचा लाभ होतो.
   दोन व्यक्तीमध्ये वादविवाद,कलह , भांडणतंटा , गैरसमज हे केव्हा निर्माण होतात , तर ते संवादाने .जर मौन राखले , कोणी कोणाशी बोललेच नाही तर मग वादाचा , कलहाचा,भांडणाचा प्रश्न हा येईलच कसा ? तसेच सर्व पातळीवर जर एखादी व्यक्ती जागरूक असेल , दक्ष असेल, सतर्क असेल तर अशा व्यक्तीस कशाचेही भय राहातं नाही .
कारण जो दक्ष आहे, साक्षी आहे, जागृत आहे त्याचे हातून कामात ,कर्तव्यात ,सेवेत चुका होत नाहित .तो निर्णयच होतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरं सत्य पाहा.....

खरे श्रीमंत कोण, ते पाहा ?

जीवनातील महत्त्वाच्या तीन गोष्टी:-