जीवनातील महत्त्वाच्या तीन गोष्टी:-
भावार्थ मार्गदर्शिका:- माणसाच्या सुखी जीवनाच्या दृष्टीने या जगात तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाचे आहे त्या म्हणजे ,अन्न ,पाणी आणि त्याचे मधुर बोल उत्तम प्रकारचे मिळालेले अन्न, पाणी ही मनुष्याचे उदरभरण करण्यासाठी मोठी मदत करते .तर त्याची मधुर वाणी त्यास अनेक जीवाभावाचे मित्र बांधव आप्त जोडून देते. माणसाला लागणारे उत्तम आरोग्य धनसंपदा ,सुख ह्या त्याच्या पूर्व धर्मकर्माचे फल असते. तर याच्या उलट म्हणजेच जर त्याने उचित धर्माचरण केले नसेल तर त्याच दारिद्र्य, रोग, व्याधी यांचा सामना करावा लागतो. माणसाला त्याच्या जीवनात मिळायला हव्यात अशा जर महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी असतील, तर त्या म्हणजे घर ,स्त्री, भूमी, धर्म आणि चांगले मित्र याच्या प्राप्तीने त्याचे संसार जीवन हे सुखकारक होऊ शकते .बाबा, हो तुम्ही जर नीट विचार केला तर तुमच्या हे सुद्धा लक्षात येईल की, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकदा ती वेळ गेली तरी, दुसऱ्यांदा किंवा परत मिळू शकतात. परंतु तुमचे श...