जगी सर्व सुखी असा कोण आहे ?
नीतीशास्त्र ÷
कोणतेही कुळ किंवा माणूस हा कशा ना कशाच्या तरी रूपाने दोषी असतोच .ज्याच्या अंगी एकही दोष नाही अशी व्यक्ती भेटणे हे फार दुर्लभ आहे. तसेच ह्या जगात नेहमी सुखी आहे अशी व्यक्ती सुद्धा कुठेही शोधून सापडत नाही.
जगी सर्व सुखी असा कोण आहे?
॓ विचारी मना तूच शोधूनी पाहे ॔॔......
माणसाच्या आचार विचार आणि कृती ह्यावरून त्यांच्या ज्ञानाची वैचारिक उंचीची कल्पना येते. लोकांनी आपले वैवाहिक संबंध जोडत असताना चांगल्या आचार विचाराच्या कुळाचा नेहमी विचार करणे हे कौटुंबिक आणि सामाजिक हिताचे ठरत असते. राजकारणाची फार जवळचा संबंध असल्याने आणि ते मार्गदर्शक असल्याने त्यांनी राजकारणातील एक फार मोठी खेळी इथे सहजतेने सांगितले आहे .आपण आपल्या शत्रूस गाफील ठेवावे किंवा त्यास अशा कोणत्यातरी छंद ,व्यसन ह्यात अडकवावे की आपल्याकडे पाहायला वेळही मिळणार नाही. आणि त्याचे तसे डोकेही चालणार नाही .मानवाला हे अत्यंत मोलाचा सल्ला देताना सांगतात की दुर्त दूरदर्शी आणि जागरूक मानवाने आपल्या भोवती अशी विश्वासू माणसे निवडावी भल्या आणि भुऱ्या अशा दोन्ही काळात त्यास कायमची साथ देतील.
लोकांच्या जीवनात शिक्षण आणि बुद्धिमत्तेला किती महत्त्व आहे हे ते पदोपदी सांगतात .ते म्हणतात की जो मनुष्य हा शिक्षित नाही, बुद्धिमान नाही, ज्ञानी नाही तो मनुष्य केवळ दोन पायांचा प्राणी असला तरी तो चार पायांच्या पशुवतच मानावा त्याची तीच योग्यता असते.
थोरांच्या लेखी माणसाची महानता त्याचे श्रेष्ठत्व हे त्याच्या नावारुपावरून देहकृतीवर न ठरवता ते त्यांच्या अंगी असणाऱ्या सद्गुणांवर निश्चित व्हायला हवे .ते पुढे असेही म्हणतात की एका व्यक्तीचे बलिदान त्याचे महान ठरलेली त्याचे कर्तृत्व हे त्याचा आणि परिणामी त्यांच्या कुळाचा उद्धार करून त्याचा नावलौकिक वाढवून जातो.
प्रत्येक माणसाने त्याचं जीवन सुख समाधानाचे होण्यासाठी ज्ञानार्जन, अर्थार्जण ,अभ्यास ,चिंतन म्हणून आणि ईश्वर जोपासना ही करायला हवी. समाजात प्रत्येकाने एकमेकांचा मानसन्मान हा राखायला ,सांभाळायला आणि तो वाढवायला हवा. सामाजिक ऐक्य हे फार महत्त्वाचे आहे.
जो मनुष्य मित आणि मृदूभाषी आहे .जो आचार, विचार आणि गुणसंपन्न आहे जो सर्वांवर प्रेम करणारा प्रत्येकाशी प्रेमाने वागणारा आहे .अशी व्यक्ती हे सहजपणे लोकांची मने जिंकून त्यांना आपलेसे करू शकतात.
निती शास्त्राच्या मते पालकांनी आपल्या मुलांच्या बरोबर कोणत्या वयात आणि कसे वागावे याचे सुंदर मार्गदर्शन केले आहे. मानवी शरीराचे मोल ओळखून ते सशक्त जसे राखायला हवे, तसेच लोकांनी त्यांचे धर्मपालन करून दानादिक कर्मे करून पुण्य पदरी जोडायला हवे...
लोकहितासाठी संत सांगतात तुम्ही मुर्ख ,अडाणी ह्या लोकांपासून सावध राहा. आपल्या धनाच्या ,धान्याच्या, सुविचारांच्या, संपत्तीचे संरक्षण करा हा संदेश जाता जाता देतो.,
धन्यवाद
आपला.............
टिप्पण्या