भाग्यवंत व्यक्ती कोण,?
भोज्य भोजनशक्तीश्च रतिशक्तीर्वरांगना ।
विभवो दानशक्तीश्च नाऽल्पस्य तपसःफलम् ।।
भावार्थ मार्गदर्शिका- ज्यावेळी एखादी व्यक्ती हे काही तप करते. आपल्या पदरी पुण्य जोडते तेव्हाच अशा व्यक्तीला उत्तम प्रकारचे अन्नपदार्थ हे भोजनासाठी मिळतात .खाल्लेले अन्न पचविण्याचे ,ते अंगी लावण्याचे ,त्यास शक्ती मिळण्याचे भाग्य लाभते .अशा भाग्यवंतास सुंदर अशी पत्नी लाभते. तसेच तो तिचा उत्तम प्रकारे भोगही घेऊ शकतो. स्वतः सुखी होतो आणि तिलाही सुखी करतो .अशा व्यक्तीस जीवनात हवे असणारे धन जसे प्राप्त होते, त्याचप्रमाणे त्या धनाचा सदुपयोग करण्याची, तसेच धनदानाचे पुण्य पदरी जोडण्याची सुबुद्धीही त्यास प्राप्त होते. पण हे भाग्य त्यास त्याच्या गतजन्मीच्या काही सुकृताचे ,पुण्याईचे फलित आहे हे विसरून चालणार नाही.
त्यामुळे माझ्या मते वाचकाहो,
टिप्पण्या