खरे श्रीमंत कोण, ते पाहा ?
मताधिक्य -
ज्याच्या गत जन्माचे पुण्य ,त्याने केलेले सर्व सत्कर्मे आणि त्याचा दयाळुपणा आणि त्याचे विवेकी विचार हे सर्व गुण हे एका असाधारण मानवाकडे असतात.
तुमच्यामते पैसा असणे हे एक श्रीमंतपणाचे लक्षण असेल पण साधु ,थोर महापुरुष किंवा विवेकी विचारी माणुस त्यांच्या मते ज्याच्याकडे राहण्यायोग्य घर ,मुबलक पैसा ,पोटापुरती जमीन,अंगावरती परीधान करण्यासाठी योग्य तो पोषाख, इतरांप्रती त्याचा स्नेहभाव , घरामध्ये मी मुबलक धनधान्य , मनामध्ये पांडुरंग चे नामस्मरण,
वडीलधारी व्यक्तींचा आपल्या मनामध्ये सदभाव असणे हे एक श्रीमंत व्यक्तीची लक्षण, हल्लीच्या हल्लीच्या काळामध्ये आपण पाहतो इंस्टाग्राम वर अनेक प्रकारचे वडीलधाऱ्या व्यक्तींची चेष्टा मस्करी केली जाते अशा व्यक्तींना त्यांच्या म्हातारपणी किंवा उतारवयाला लागल्यावरती या सर्व गोष्टींची परतफेड कोणी ना कोणी करीत असतो त्यामुळे मित्रहो योग्य तो निर्णय आपल्या हाती आहे माझ्या प्रियजनाने श्रीमंत व्यक्तीचे लक्षण हे पैसा घमंड इतरांप्रती द्वेष, भावना, माजुरपणा , इतरां प्रतिक्रोध राग मत्सर, एक अविचार व्यक्तीचे लक्षण आहे . आपण उदाहरणार्थ प्रयाग धम मध्ये असलेले नागा महाराज यांचे उदाहरण घेतले तर ते अंगावरती वस्त्र सुद्धा घालत नाही म्हणजे त्याचे भगवंता प्रति किती अपारनिष्ठा आहे.
तर मित्रांनो श्रीमंत व्यक्ती हा ज्याच्याकडे निरोगी शरीर, अन्नपचविण्याचे योग्य पाचन यंत्र ,विवेकी बुद्धी ,सर्वांप्रती प्रेम, स्नेहभाव ,सर्वांचा आदर सन्मान करणारे ,मुक्या प्राण्यांच्या प्रति प्रेमभाव ,शाकाहारी असलेले त्यांचे सहकुटुंब सहपरिवार ज्यांच्या घरात कसलाही आजार नांदत नाही ज्यांच्या घरात कसलेही वादविवाद होत नाही, योग्य विचार असलेले त्यांचे सहपरिवार सहकुटुंब हे खऱ्या अर्थाने आजच्या कलियुगाच्या काळात आणि साधुसंतांच्या मते ही खरोखर असलेले श्रीमंत सहकुटुंब आणि सहपरिवार त्यामुळे मित्रांनो आपण सन्मार्गाने जगावे कोणाचीही अवहेलन करू नये.
कोणालाही वाईट बोलू नये जर आपल्या क्रोधावर नियंत्रण नसेल तर आपण काही गोष्टी टाळू शकतो ,माझ्या प्रिय जनान हो ,तुम्ही केलेले सत्कर्म हे तुम्हाला शिष्ट वाटेल किंवा खोटे वाटेल पण हे खोटे नाही हे खरोखर या कलियुगात आपल्याला निदर्शनात येते कारण आपल्या सभोवताली असलेले हॉस्पिटल जाऊन बघा तिथे अपार प्रमाणात गर्दी ही असतेच कारण योग्य नसलेले शरीर आणि आपले विचार हे आपल्याला त्या गोष्टीकडे वळवतात. योग्य तो मार्ग निवडा सन्मार्ग निवडा आपल्या घरात सुख शांती नांदावी यासाठी प्रयत्न करावे श्रीमंत तर सगळीच आहे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा .विचार हे आपल्या हाती असते
धन्यवाद..
टिप्पण्या