मानवी मनाची शांतता कशात ?
कोण्या एका व्यक्तीचे मनोगत-
पांढरा रंग म्हणजे शांतीचे प्रतीक .जसा रंग जसा रंग तशी त्याचे गुण आहेत .त्यावर कसलाही डाग सहन होत नाही तशीच आहे शांतता म्हणजे वातावरण शांतता म्हणजे मानवी मनाची सहनशीलता जर माणसाकडे शांतता असेल तो कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो आपण आपल्या सभोवताली अनेक अशी व्यक्ती महत्त्व आहेत ती खूप शांत आहेत, आणि त्यांची प्रगती त्यांच्या सारखीच आहे ,त्यामुळे आपण आपल्या परिस्थितीचा आढावा घेऊन अनेक पुस्तकांचे वाचन करू मनाला शांतता लाभावी यासाठी प्रयत्न करावे. आपले मन खूप चंचल आहे त्यामुळे मनाला लगाम घालण्यासाठी
विचारांचे थोर मायाजाळ तयार करावे.
गौतम बुद्ध सांगतात की मला सर्व काही घरात प्राप्त झाले असते. पण ते मला कळालच नाही म्हणून मी घर सोडून गेलो.
पहा मित्राहो त्यांच्या निरागस मूर्ती त्यांची प्रतिमा ही किती निरागस आहे. म्हणजे आपण अलीकडच्या काळात तर त्यांना पाहिलेले नाही .तरीपण त्यांच्या प्रतिमेचा आढावा घेऊन त्या काळचे ते किती शांत आणि निर्मळ मनाच्या असतील. सर्वांना ज्ञानाच्या गोष्टी सांगत तशीच अनेक संत होऊन गेले त्यांच्या चेहऱ्यावर खूप शांतता, खूप संयम, खूप धीर अलीकडच्या धावत्या आणि पळत्या युगात शांतता काय आहे हे कोणालाच माहीत नाही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाची ताणतनावाचे वातावरण तयार असते. मला सांगा मित्रहो
ह्या पृथ्वी तलावातुन ज्यावेळेस आपल्याला मोक्ष प्राप्त होईल त्यावेळेस आपण आपल्या सोबत काय घेऊन जाणार आहे परंतु मनला लागलेली शांतता आणि आपण काही गोष्टींचे केलेले मनोमन विचार किंवा चिंतन या गोष्टी आपल्याला चिरंतन म्हणजे आपला जोपर्यंत हा पवित्र आत्मा आहे तोपर्यंत आपल्याला चिंतन केलेल्या गोष्टी भेटतात, आता तुम्ही म्हणसाल प्रत्येकाची प्रॉब्लेम हे वेगळे असतात. कोणाचे पैशाची प्रॉब्लेम तर कोणाची वेगळीच प्रॉब्लेम अशी अनेक प्रॉब्लेम आहे कोणावर दवाखान्याची संकट तर नको तर नको असलेल्या गोष्टी सतत आपल्या आयुष्यात घडत असतात त्या आपल्या मनाला लागलेल्या ताण तणावाच्या रोगामुळे अनेक आपल्या आयुष्यात नको असलेल्या गोष्टी करतात त्यामुळे आपण सतत कितीही मोठा संकटात असलो तरी आपल्या चेहऱ्यावर शांतता संयम निश्चय ही झळकलं पाहिजे कारण समोरचा व्यक्ती आपल्या चेहऱ्याकडे जेव्हा बघतो तेव्हा त्याला जाणवलं नाही पाहिजे की आपण खूप मोठ्या संकटात आहे त्याला असं वाटलं पाहिजे की
किती आहे ह्या ह्या व्यक्तीकडे संयम आहे शांतता आहे . चला आपण अलीकडच्या काळातील ऑर्डर आहे ट्रेडर्स आहे त्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या शारीरिक हालचालीवर पहा कधीतरी की कधी त्यांना लॉस होतो तर कधी त्यांना प्रॉफिट होत त्यामुळे ती ज्यावेळेस लॉस होतो त्यावेळेस ती लॉस कव्हर करण्यासाठी खूप मेहनत करतात आणि त्यांच्या मनाची खूप चिडचिड होत असते .
शांतता म्हणजे निरोगी शरीर ,निरोगी मन, निरोगी मस्तीष्क ,भव्य, दिव्य अशी विचार करण्याची क्षमता म्हणजे शांतता.
सर्वांचे स्वप्न पूर्ण होतात हे शक्य नाही कारण काही गोष्टींचे पालन करून किंवा प्रयत्न करून सुद्धा आपल्याला योशोगाथा
गळ्यात पडते नाही त्यामुळे माझ्या प्रिय जना हो ,!
शांतता हे एकमेव साधन आहे ....
टिप्पण्या