जीवनातील महत्त्वाच्या तीन गोष्टी:-

भावार्थ मार्गदर्शिका:-
      
                  माणसाच्या  सुखी जीवनाच्या दृष्टीने या जगात तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाचे आहे त्या म्हणजे ,अन्न ,पाणी आणि त्याचे मधुर बोल उत्तम प्रकारचे मिळालेले अन्न, पाणी ही मनुष्याचे उदरभरण करण्यासाठी मोठी मदत करते .तर त्याची मधुर वाणी त्यास अनेक जीवाभावाचे मित्र बांधव आप्त जोडून देते.माणसाला लागणारे उत्तम आरोग्य धनसंपदा ,सुख ह्या त्याच्या पूर्व धर्मकर्माचे फल असते. तर याच्या उलट म्हणजेच जर त्याने उचित धर्माचरण केले नसेल तर त्याच दारिद्र्य, रोग, व्याधी यांचा सामना करावा लागतो. 
     माणसाला त्याच्या जीवनात मिळायला हव्यात अशा जर महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी असतील, तर त्या म्हणजे घर ,स्त्री, भूमी, धर्म आणि चांगले मित्र याच्या प्राप्तीने त्याचे संसार जीवन हे सुखकारक होऊ शकते .बाबा, हो तुम्ही जर नीट विचार केला तर तुमच्या हे सुद्धा लक्षात येईल की, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकदा ती वेळ गेली तरी, दुसऱ्यांदा किंवा परत मिळू शकतात. 
   परंतु तुमचे शरीर हे सुद्धा इतके लाख मोलाचे आहे की, ते मात्र एकदम मशानात गेले, जळले की परत मिळत नाही. याकरिताच ह्या प्राप्त शरीराचा उपयोग करून तुम्ही तुमच्या स्वधर्माचे पालन करावे आणि प्राप्त निर्जन्म हा सार्थकी लावावा यातच तुमचे परम कल्याण आहे. 
माणूस हा अदिकाळापासूनच समूहात राहणे पसंत करत आलेला आहे .याचा लोकसमूह अर्थात समाज हाच त्याचा रक्षक आणि तेच त्याचे संघटित बळ असते. एक संघटित समाज हा जगात नेहमीच बलशाली ठरतो. त्या संघटित सामर्थ्याने तो मोठमोठे शत्रूंचाही पराभव करू शकतो. माणसाच्या जीवनात असे काही प्रसंग वेळ या येतात की, जेव्हा त्यालाच त्याबद्दल विचार करायला प्रवृत्त करतात. उदाहरणार्थ:-जेव्हा एखादी व्यक्ती ही आपल्याच खांद्यावरून कोणास स्मशानात घेऊन जात असते त्यावेळी त्याच्या मनात वैराग्याची भावना नश्वरतेची जाणीव आल्याशिवाय राहत नाही माणूस  अशावेळी जीवनाचं काही खरं नाही रे बाबा असे म्हणतो ही .
     पण ते त्याचे खरे वैराग्य नसते ,तर ते फक्त स्मशान वैराग्य असते . जेव्हा एखादी व्यक्ती ही व्याधीग्रस्त असते तेव्हा त्याला क्षणोक्षणी देवाची आठवण होत असते. ईश्वराचे स्मरण हे असे कारणपरत्वे असू नये ,तर ते नित्य आणि अखंडित असावे.जेव्हा एखादी विवेकी , विचारी माणसाच्या हातुन एखादे पापकर्म अथवा दुष्कर्म घडले तर त्यास त्याचा नंतर पश्चातापही होतो.अशा पश्चातापाने एक गोष्ट चांगली घडते ती म्हणजे त्याचा विचार परिवर्तन.हे असे दुष्कर्म घडल्यावर त्याचा पश्चाताप करीत बसण्यापेक्षा ते घडणारच नाही ह्यावर कटाक्ष ठेवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
  नरजन्माची खरी सार्थकता ही मोक्षाची प्राप्ती करून घेण्यातच आहे. माणसाने अभिमान हा दूर ठेवावा.कारण तो नदीत स्वतः बरोबरच तुम्हालाही घेऊन बुडणा-या माणसासारखा घातक आहे.जगात मीच श्रेष्ठ असा वृत्ताभिमान बाळगूने कारण जगात तुमच्या पेक्षाही श्रेष्ठ आणि एकापेक्षा एक वरचढ अशी माणसे आहेत 
 जी व्यक्ती आपल्याला अत्यंत प्रिय आहे जिनी आपल्या मनात घर केले आहे ती व्यक्ती तुमच्या पासन कितीही योजने दूर असली तरी ती तुमच्या जवळ असते पण एखादी व्यक्ती अगदी तुमच्या जवळ आहे पण ती तुम्हास प्रिय नसेल तिने जर तुमचे मन जिंकलेले नसेल तर ती व्यक्ती जवळ असूनही तुमच्या लेखी फार दूर असते. 
    कुटनीतीच्या आधाराने सामान्य व्यक्तीने आपल्या शत्रूचा पूर्णपणे अंदाज घ्यायला हवा जर आपला शत्रू हा आपल्यापेक्षा जास्त प्रबळ अशीच तर त्याला शक्यतो गोड बोलून त्याच्याशी सख साधून मैत्री करून आपला असा करावा त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवावे सदैव्य सतर्क राहावी मात्र आपण हे करीत आहोत याची त्याला जराही शंका येणार नाही याची काळजी घ्यावी 
  जीवनातली आणखीन एक सावधानता शिकवत असताना ते सांगतात की आग गुरु आणि स्त्री ह्यांच्यापासून ह्यांच्यापासून आपण नेहमी सुरक्षित अंतरावर राहावे त्यांच्यापासून असे फार दूर जाऊ नये तसेच त्यांच्या फार जवळ सुद्धा जाऊ नये दोन्हीकडे आपलेच नुकसान आहे. 
  जर तुम्हाला लोकांना आपल्याशी करायचे असेल तर त्यांच्याशी प्रेमाने वाग आणि त्यांचे मन जिंका हा सल्ला देतात .
    एखाद्या वस्तूकडे व्यक्तीकडे कोण कोणत्या नजरेने पाहतो यावर त्याचे महत्त्व ठरते ते कशी येते सुद्धा आपल्याला उदाहरणांनी फुटून देतात स्त्रीकडे एक योगी एक सामान्य मनुष्य आणि कुत्र्यासारखा एक प्राणी , ते तिघेही ते अशा वेगवेगळ्या विचारांनी पाहतात  हे सांगतात. 
  लोकांचे हितासाठी थोर विचारवंत असा सल्ला देतात कि बाबा हो तुम्ही उगाच कोणाकडे तुमची रहस्य सांगत बसू नका कधी कोण तुमचा विश्वासघात करेल ते सांगता येत नाही तुमच्या घरातल्या गोष्टी तुमचे स्त्री सबंध ह्याची चार चौघात वाच्यता करू नका. महात्मा ही मौन पाळण्यास भर देतात.ते ती म्हणतात की काही गोष्टी लोकांना आपल्या बऱ्या वाईट ह्या इतर लोकांकडे बोलायला फार आवडतात पण ते फार चुकीचे आहे तसेच संकट वाईट वेळ प्रसंग याचा उगाच भाऊ वाटा न करता त्याबद्दल मोहन राखा. 
   धनाचे मानवी जीवनात फार मोठे स्थान असले तरी ,ते कमवत असताना तुम्ही फार दक्ष राहा त्याचा संग्रह आणि त्याचा सदैव हा विचारपूर्वक करा आपल्या जीवनाचे कल्याण साधण्यासाठी सद्गुरूंना शरण जा त्यांचा बोध त्यांची, शिकवण मनास्मृतिपणाने लावून घ्या जीवनात मार्गदर्शक ठरतील असे मनावर कोरून ठेवा .
कधीही दृष्ट आणि दुर्जनांची संगत करू नका त्यांच्यापासून दूर राहा स्वतःची कल्याण कशी होईल ते कशात आहे त्यासाठी काय करायला हवे याचा सातत्याने विचार करा योग्य ती पावली उचला स्वतः सुखी व्हा आणि इतरांनाही सुखी करा शेवटचा तर सल्ला त्यांना हा इतका मोलाचा आहे की काय सांगायचे की म्हणतात की बाबा रे या जगात की मानवी जीवन सुद्धा हे   नश्वर आहे, अनित्य आहे, अशाश्वत आहे .इथे पुढच्या घटकाला काय होईल हे कोणास सांगता येत नाही .तेव्हा सदैव सावध राहा .त्या परमेश्वराचा सतत विचार करा .त्याला शरण जा, त्याचे अनुसंधान ठेवा आणि ईश्वर जोपासना करून आपल्या प्राप्त नर जन्माची सार्थकता साधून घ्या...
   
  धन्यवाद 
         आपला ,
     हितकारक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरं सत्य पाहा.....

खरे श्रीमंत कोण, ते पाहा ?